बुधवार, २ नोव्हेंबर, २०११

पाऊस दाटलेला

पाऊस दाटलेला... घन ओथंबलेला..
दूर दूर धुक्यात रस्ता हरवलेला...
शांत संतत धारा... मेघात अडकला वारा...
धुंद हवेत आला अंगावरी शहारा...

झाले झिम्माड झिम्माड... आली पावसाची सर...
पानाफुलांनी बहरली सारी सृष्टी चराचर ....
खेळ सुरु झाला पुन्हा ऊनपावसाचा...
कोवळ्या उन्हात चमके थेंब, जणू मोत्याचा...

रानारानात जागली ओळी कोवळी पहाट...
डोंगरातुनी डोकावते हिरवी पायवाट...
पानावर उमटतसे थेंबाथेंबांची नक्षी ...
चराचर सृष्टी बहरतसे पावसा ठेवून साक्षी.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा