बुधवार, २ नोव्हेंबर, २०११

प्रेम म्हणजे नक्की काय असतं..???

प्रेम म्हणजे नक्की  काय असतं..???
उमलणाऱ्या फुलाच्या सुगंधाची चाहूल असतं...
आकाशात उमटणार सप्तरंगी इंद्रधनू असतं...

प्रेम म्हणजे  नक्की  काय असतं..???
प्रेम कधी 'हसणं' असतं...
प्रेम कधी 'रुसणं' असतं....
प्रेम म्हणजे जगण्यातला आनंदाचा सूर असतं...

प्रेम म्हणजे  नक्की  काय असतं..???
मनातलं गुपित डोळ्यातून वाचलेलं असतं...
स्पर्शाच्या भाषेतून शब्दांना जाणलेलं असतं...

प्रेम म्हणजे  नक्की  काय असतं..???
प्रेम कधी 'जगणं' असतं...
प्रेम कधी 'मरणं' असतं...
प्रेम म्हणजे कोणासाठी तरी 'वेडं होणं' असतं...

प्रेम म्हणजे  नक्की  काय असतं..???
साध्या साध्या गोष्टीतून कोणीतरी खुणावत असतं...
दूर असताना सुद्धा त्याच्या असण्याचा भास असतं...

प्रेम म्हणजे  नक्की  काय असतं..???
प्रेम कधी 'आशा' असतं..
प्रेम कधी 'निराशा' असतं...
प्रेम म्हणजे रंगवलेल्या स्वप्नांच्या पूर्णत्वाची भाषा असतं...

प्रेम म्हणजे  नक्की  काय असतं..???
मनाने मनाला दिलेली आर्त साद असतं...
एकमेकांच्या भावनांना दिलेली दाद असतं..

प्रेम म्हणजे  नक्की  काय असतं..???
प्रेम कधी 'बेभान होणं' असतं...
प्रेम कधी' भानावर येणं' असतं..
प्रेम म्हणजे स्वप्नांसोबत वास्तवात जगणं असतं...

प्रेम म्हणजे  नक्की  काय असतं..???
आयुष्याच्या वाटेवरती कोणाची तरी साथ असतं..
विश्वासाने धरलेला न सुटणारा हात असतं..

प्रेम म्हणजे  नक्की  काय असतं..???
प्रेम कधी 'भेटीची आस' असतं..
प्रेम कधी 'मिठीचा भास' असतं...
प्रेम म्हणजे आपल्या मनाने कोणाचा तरी घेतलेला ध्यास असतं..

प्रेम म्हणजे  नक्की  काय असतं..???
'तुझं-माझं' 'मी' पण जाऊन 'आपलं' म्हणणं असतं..
दोन जीव म्हणून जगताना मनाने एकरूप होणं असतं..

प्रेम म्हणजे  नक्की  काय असतं..???
प्रेम कधी 'घातलेला वाद' असतं..
प्रेम कधी 'अबोल संवाद' असतं..
प्रेम म्हणजे वाट बघताना कोणासाठी तरी अवघडलेला श्वास असतं...

पाऊस दाटलेला

पाऊस दाटलेला... घन ओथंबलेला..
दूर दूर धुक्यात रस्ता हरवलेला...
शांत संतत धारा... मेघात अडकला वारा...
धुंद हवेत आला अंगावरी शहारा...

झाले झिम्माड झिम्माड... आली पावसाची सर...
पानाफुलांनी बहरली सारी सृष्टी चराचर ....
खेळ सुरु झाला पुन्हा ऊनपावसाचा...
कोवळ्या उन्हात चमके थेंब, जणू मोत्याचा...

रानारानात जागली ओळी कोवळी पहाट...
डोंगरातुनी डोकावते हिरवी पायवाट...
पानावर उमटतसे थेंबाथेंबांची नक्षी ...
चराचर सृष्टी बहरतसे पावसा ठेवून साक्षी.....

ही कविता सुचली ती खालसा कॉलेज मध्ये एका ट्रेनिंग साठी गेले असताना....ही कविता त्या ट्रेनिंग साठी आम्हाला शिकवणाऱ्या आणि guidance देणाऱ्या सर्वाना उद्देशून आहे... त्यांच्या या उपक्रमाला माझ्याकडून दिल्या गेलेल्या शुभेछा...

आयुष्याच्या वळणावरती माणसे भेटती नवी नवी...
त्यांच्या सहवासाची ओढ वाटतसे हवी हवी...
साध्या सुंदर जगण्याची मिळाली एक वेगळी दिशा...
तुमच्या सहकार्याने जागवली मनातील स्वप्ने आणि आशा...
जीवनातील ध्येयासाठी मिळावा एखादा मार्गदर्शक... पण कसा??
तो असावा तुम्हा सारखा, देणारा ज्ञानाचा वसा...
असाध्य होते साध्य जेव्हा धराल प्रयत्नांची कास...
दिलात संदेश तुम्ही, हाच जगण्यातील आनंदाचा ध्यास...
यशस्वी होण्या नेहमीच असावी संघटीत मनांची साथ...
मात्र असावे सदा विनयशील , नेण्यास पुढे देऊन हात....

खूप अवघड असतं.............

खूप अवघड असतं, काही गोष्टी विसरणं....
नको असताना  सुद्धा हसत हसत स्विकारण...
घडलेल्या घटनेवरती शांतपणे विचार करणं...
'हातात काही नाही' जाणवल्यावर मनाला सावरणं...

खूप अवघड असतं एखाद्याला जीव लावणं...
आपलं अस्तित्व विसरून दुसर्यासाठी जगणं..
कधी धडपडून देखील पुन्हा उभारी घेणं...
नव्या स्वप्नांच्या दाही दिशांना प्रवास करणं...

खूप अवघड असतं अपमानाने खचून न जाणं..
आलेल्या अवघड क्षणांवर हसत मात करणं...
आपला आधार हरवला तरी दुसर्याचा आधार बनणं...
दुसर्याच्या  समाधानी डोळ्यातून जग बघणं...

खूप अवघड असतं नात्यात गुंतत जाणं...
नात्यात गुंतल्यावर अलगद अलिप्त होणं...
आपल्या अपेक्षा विसरून निस्वार्थी मानाने जगणं..
आपल्यातलाच चांगला आणि वाईट माणूस शोधणं...

खूप अवघड असतं, क्षणाचं मोल जाणणं ...
प्रत्येक क्षण जगताना उत्कटपणे जगणं...
सुखदुखाच्या छायेखाली आपल्याला फुलवणं..
निराशेच्या गर्तेतून पुन्हा आशेचे पंख पसरवणं..

खूप अवघड असतं स्वप्नातून जागं होणं..
वास्तवाचे चटके सहन करून पुन्हा स्वप्नं पाहणं..
जगण्याची धडपड करताना आपलाच आधार बनणं..
अनुभवातून शहाणं होता होता 'माणूस' म्हणून जगणं...

पहिला पाऊस

पहिला पाऊस...त्याचीच आठवण...
दाटून आलेलं,अवघडलेपण..
ओलेचिंब झाले प्रत्येक पाऊल..
मनात जाणवणारी  त्याचीच चाहूल...

पिसाट बेभान, सुसाट वारा...
त्याने छेडलेल्या  हृदयाच्या तारा...
टपटप थेंबांचा हळुवार ताल..
त्याच्या स्पर्शाची नाजुकशी शाल...

झोंबणारा वारा , झिम्माड पाऊस...
त्याच्या आठवणींचा पिंजलेला कापूस...
बरसती धारा, अंगणी क्षणात...
अजून होता 'तो' तसाच स्मरणात...

हिरव्या रंगाच्या मऊशार वाटा...
'तो' म्हणजे मनात रुतलेला काटा...
चिंब चिंब  होऊनी, काही राहून गेलेले...
माझ्या प्रत्येक क्षणात त्याला मी जपलेले...

पाऊस येतो असाच नेहमी...
जाणवते मग त्याचीच कमी...
कधी कोसळतो, कधी देतो हूल..
नसूनही त्याच्या असण्याचे खूळ...

पाऊस आणि माझे , जन्मापासूनचे बंध...
तसा आहे का रे आपल्या नात्याचा सुगंध...
दूर असूनही तू माझ्या आर्त मनात...
असेन का रे मी तुझ्या, एखाद्या क्षणात....???????????