एक संध्याकाळ.....सैरभैर करणारी...
माणसात असून सुद्धा अगदी एकटं पाडणारी...
आठवणींच्या क्षणांनी बैचैन करणारी..
सलणाऱ्या वेदनेला,तरी सुद्धा जपणारी...
एक संध्याकाळ...मंतरलेली..
आशेच्या किरणांनी प्रकाशलेली...
विश्वासाच्या आधारे तरारलेली..
मायेच्या छायेत बहरलेली...
एक संध्याकाळ... वेड्यागत वागणारी..
उगाचच हसवत डोळ्यात पाणी आणणारी...
स्वप्नांच्या जगात हळूच डोकावणारी...
पण वास्तवाला मात्र न विसरणारी...
एक संध्याकाळ... स्वप्नाळलेली....
प्रयत्नांच्या ज्योतीने उजळलेली....
अतूट नात्याने जुळलेली....
स्नेहबंधनाने मोहरलेली....
एक संध्याकाळ... घुसमटलेली.....
वेदनेच्या हुंदक्यांनी दबलेली....
भीतीच्या वातावरणात दडपलेली.....
प्रेमाची भाषाच हरवलेली.....
एक संध्याकाळ.. स्मरलेली.....
कायम मनात जपलेली....
मौनातूनही खुललेली.....
क्षण अन् क्षण जगलेली....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा