त्या दिवशी चिंब पावसात भिजताना तिला तो आठवलाच.... मुंबईच्या college मध्ये नुकतीच ती रुजू झाली होती तेव्हाची गोष्ट...!! संध्याकाळच्या वेळी ढग जमा झालेले पाहून तिने जितक्या लवकर practical संपवता येईल तितक्या लवकर संपवलं आणि विद्यार्थ्यांना घरी वेळेत जा सांगून ती सुद्धा निघालीच... कारण मुंबईचा पाऊस बेभरवशाचा असतो हे माहित होतं तिला ... कधी रिपरिप , कधी धुवांधार किंवा कधी एखादी सर येते आणि जातेही; नाहीतर कधी अचानक रौद्र रूप धारण करणारा पाऊस तिच्या चांगल्याच परिचयाचा होता .. असा पाऊस सुरु झाला की traffic jam , Trains बंद किंवा काहीबाही problems trains चे... म्हणून वेळेत घरी पोचायला हवं ह्या विचाराने तिची पावलं जरा झपाझप पडू लागली... college मधून बाहेर पडताच क्षणी पावसाने जोरदार बरसायला सुरवात केलीच...!! ' जणू दबा धरून बसला होता की काय आपण कधी बाहेर पडतोय हे पहात ....!! ह्या विचाराने तिला थोडा वैताग आला आणि हसूही.... !! ''एका दृष्टीने बरंच झालं, निदान आपल्यासोबत कोणीतरी आहे '' असा विचार आला तिच्या मनात... पावसासोबत ओल्या मातीचा सहज येणारा सुगंध श्वासात साठवत ती निघाली. हा मातीचा सुगंध कायमच तिला आवडत असे.
तिने सहज आकाशाकडे पाहिलं. एरवी निळ्या रंगाचं असणारं आकाश आज काळ्या रंगाच्या अनेकविध छटांनी भरून गेलं होतं... दूरदूरवर फक्त काळ्या रंगाचे ढग दिसत होते तिला. 'काळ्या रंगाच्या इतक्या छटा असू शकतात...!!!!! ' हे तिला आज प्रकर्षाने जाणवलं... काळे ढग आज तिला इतके सुंदर भासले की नकळत तिच्या मनात आलं, "काळा रंग.. कायम उदास आणि केविलवाणा, नैराश्याच्या जाणीवा जागृत करणारा...!! समाजाने काळ्या रंगाला कायम दुय्यम मानलं आहे पण हाच काळा रंग आपल्यासाठी वरदान आहे हे कोणाला कधीतरी जाणवत असेल का ?? काळ्या रंगाचा वापर आपण कुठल्याही शुभ प्रसंगी करत नाही कधीच, पण आज या काळ्या रंगात कुठेही निराशा नाही, केविलवाणा सूर नाही तर चैतन्याचा धबधबा आहे दडलेला....शुभशकुन देणारा !!!"
पावसाने सगळं रूपच पालटून गेलं होतं... झाडांच्या पानांची होणारी हालचाल.. पावसाच्या थेंबांचा होणार आवाज ... पावसासोबत येणारा गार वारा ... हवेत आलेला ताजेपणा.. आणि त्यासोबत अचानक आलेल्या जोरदार सरीने सगळ्यांची केलेली त्रेधा तिरपीट पाहत पाहत ती रस्त्याने जात होती... खरतरं taxi मिळाली असती तर लवकर station ला पोचता आलं असतं ही... !! पण आजच्या या पावसाने तिच्या मनाला वेगळीच भुरळ पडल्यागत झालं. दिवसभराचा ताण आणि कंटाळा त्या पावसात कुठे गायब झाला ते तिलाच कळलं नाही. आणि म्हणूनच ' या पावसात मस्त भिजत जाऊ...!!" असा विचार करून ती एकटीच मुख्य रस्त्यावरून जात होती.
आसपासच्या सगळ्याच भागात पाणी हळूहळू जमा होऊ लागलं होतं. छोटी मुलं आपल्या schoolbags सांभाळत उड्या मारत त्या पाण्यातून खेळत चाललेली तिला दिसली... कोणी छत्री धरून, कोणी raincoat सावरत हळूहळू सावकाश जात होते... कोणी छत्री जवळ नसल्याने दुकानाच्या आडोशाला उभे राहत पाऊस थांबण्याची वाट पाहत होते...!! ती देखील छत्री धरून रस्त्याने जात होती; पण पावसाने, त्या छत्रीचा काही फायदा होणार नाही हे सिद्ध करायचा चंग बांधल्यागत जोरदार कोसळायला सुरवात केली..,, उलटा पालटा वारा त्या छत्रीचा निभाव आपल्यासमोर लागू देत नव्हता... शेवटी कंटाळून तिने छत्री बंद केली आणि त्या कोसळणाऱ्या पावसात चिंब भिजत ती चालू लागली...पाण्याच्या त्या स्पर्शाने तिला खूप छान वाटलं... आणि डोळे मिटून त्या पावसाच्या धारा अंगावर झेलताना अचानक तिला तो आठवला....!!!!
अशाच पावसात आपण पहिल्यांदा पाहिलं होतं त्याला college मध्ये . college चा पहिला दिवस होता आणि आपल्याला पावसामुळे उशीर झाला होता...धावतपळत पहिलं lecture कुठे चालू आहे तो वर्ग शोधण्यासाठी आपण लगबगीने कॉलेजच्या प्रांगणात आलो होतो.. नोटीस बोर्ड वर शोधाशोध करत आपण निघालो होतो, आणि तेव्हा तो college च्या प्रांगणातच अशाच मुसळधार पावसाचा मनसोक्त आनंद घेत भिजत होता.. आपल्या आजूबाजूला काय चालू आहे , कोण आहे याची पर्वा ना करता... He was enjoying every single moment at that time ....!!
त्याला पाऊस खूप आवडायचा.. आणि असा मुसळधार पाऊस तर खूपचं आवडायचा... अशा पावसात कायम भिजत जाण्याचा हट्ट असायचा त्याचा...तो नेहमी म्हणायचा, '' आता आहोत तो क्षण पूर्णपणे अनुभवायचा.. कदाचित परत असा क्षण आयुष्यात येईलच अशी guarantee नाही... so उगाच कशाला नाही म्हणायचं एखाद्या गोष्टीला.. आहे तर मस्त enjoy करावी ती त्या क्षणाला .." कितीही समजवावं तरी काहीवेळा अगदी लहान मूलागत हट्ट करायचा तो.. त्याच्या डोळ्यात निष्पाप मुलासारखे भाव असायचे ... ते भावुक डोळे पाहून मग आपल्याला सुद्धा त्याचा तो हट्ट मोडवत नसे आणि आपणही त्याच्यासोबत असेच भिजत जात असू....नंतर होणारा सर्दी आणि शिंकाचा त्रास मात्र तेव्हा डोक्यात अजिबात येत नसे....!! गप्पा, चेष्टा मस्करी करता करता आपण कधी एकमेकांशी नकळत खूप काही बोलू लागलो होतो हे तेव्हा कळलंच नाही... College ची वर्ष संपली तेव्हा आपण एकमेकांना आयुष्याचा जोडीदार मानलं होतं.. तशा आणाभाका ही घेतल्या होत्या खऱ्या.. अशाच पावसात घेतल्या होत्या... !!! पण भविष्यात काय मांडून ठेवलाय हे थोडीचं माहित होतं आपल्याला...??
पावसाळ्यात भटकंती करताना त्याच्यासोबत घालवलेले असंख्य क्षण आठवले तिला...!! रस्त्यावर पडणाऱ्या टपोऱ्या थेंबांकडे पाहताना तिला आठवले त्याचे टपोरे डोळे... तिच्यासाठी आतुरलेले... तिच्यावरील प्रेमाने वेडे झालेले...!!! असाच होता तो...आजही अगदी स्पष्ट आठवलं तो तिला... अचानक मनातलं काहीतरी हललं आणि काळ्या रंगाचं मळभ दाटून आलं.... !!! तोच काळा रंग... मनाच्या गाभाऱ्यात नैराश्याने भरून आलेला .. !! आणि बाहेर असणारा चैतन्याने ओथंबलेला... !!!
त्याला इतक्या वर्षात आपण परत भेटलो नाही, पाहिलं सुद्धा नाही... Mumbai मध्ये असून सुद्धा आपण एकमेकांपासून किती दूर निघून गेलो.... ?? एकेकाळी इतके जवळ होतो एकमेकांच्या आणि आता कुठे शोधावं तरी सापडू नये असे दूर आहोत एकमेकांच्या ... ?? कदाचित आपणच पुन्हा त्याचा शोध नाही घेतला ... कदाचित त्याने घेतला असेलही पण आपणच आपला पत्ता लागू दिला नव्हता त्याला... तो पावसाच्या सरीसारखाच आयुष्यात आला आणि मुसळधार पावसासारखाच प्रेम बरसून गेला... आपल्या प्रत्येक क्षणाला ओला सुगंध देऊन गेला..!
त्याच्या असण्याचा,त्याच्या हट्टाचा, त्याच्या हळुवार स्पर्शाचा, त्याच्या चुंबनाचा, त्याच्या मिठीचा भास आजही तितकाच स्पष्टपणे जाणवला तिला.. .. मनातल्या मनात किती जपलाय आपण त्याला आजही हे जाणवलं तिला... !! '' काय मजा आहे ना आयुष्याची..??. जवळ असणारी माणसं अचानक इतकी परकी होऊन जातात... ??'' तिच्या डोळ्यात त्याच्या आठवणींनी पाणी दाटून आलं. एक क्षण तिला वाटलं, '' त्यालाही आपण अशा पावसात आठवत असू का..?? त्याच्याही डोळ्यात आपल्या आठवणींनी पाणी येत असेल का..?? त्यालाही असा पाऊस आपल्या आठवणींनी छळत असेल का...?? ''
एकमेकांच्या मनाचे रंग जाणणारे आपण , एकमेकांची भाषा बोलणारे आपण आज मौनव्रत घेतल्यागत असे गप्प कसे झालो, याच नवल वाटलं तिला.... अचानक एकदम गळून गेल्यागत झालं तिला.. जो पाऊस मगाशी तिला आवडू लागला होता त्याच पावसाने तिला एकदम एकटं एकटं करून टाकलं होतं ... आता तर तिच्या डोळ्यातही पाऊस दाटून आला होता.. तसाच तितकाच मुसळधारपणे कोसळणारा... त्याच्या आठवणींचा... !!!
एकमेकांच्या मनाचे रंग जाणणारे आपण , एकमेकांची भाषा बोलणारे आपण आज मौनव्रत घेतल्यागत असे गप्प कसे झालो, याच नवल वाटलं तिला.... अचानक एकदम गळून गेल्यागत झालं तिला.. जो पाऊस मगाशी तिला आवडू लागला होता त्याच पावसाने तिला एकदम एकटं एकटं करून टाकलं होतं ... आता तर तिच्या डोळ्यातही पाऊस दाटून आला होता.. तसाच तितकाच मुसळधारपणे कोसळणारा... त्याच्या आठवणींचा... !!!