शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

आठवण

काय असते आठवण..?? मनातली साठवण...
पावसाची सर...ओलाचिंब स्वर...
झोम्बणारा वारा .. अंगावर शहारा ....
वळवाच्या गारा ... छेडलेल्या तारा...
रातराणी धुन्द ... मातीचा सुगंध...
आभाळाचे रंग... भावनांचे तरंग...
हरवलेल्या वाटा ... रुतलेला काटा...
सुखाचा आधार ... दुःखातील भार...
क्षणांचा मेळ ... आयुष्यातील खेळ ...
रिते रिते मन ... अस्वस्थ अवघडलेपण ...
न तुटलेले बंध ...प्रेमाचे अनुबंध...
कुंद कुंद मेघ ...  अवघडत पुसलेली रेघ... 

सरीवर सर

सरीवर सर पावसाचा जोर
थेंबाथेंबासवे नाचे आनंदाचा मोर

मन तरल तरल ,काय क्षणात बदल ...!!!
आठवणींतूनी कोणी स्मरलं स्मरलं ....!!!

रान झालं ओलं ओलं हिरव्या रंगानी सजलं....
थेंबाथेंबांच्या स्पर्शाने अंग भिजलं भिजलं ....!!!

आली पावसाची सर माझ्या मनात मावेना...!!
ओल्या मातीची नाही कशाशी तुलना...!!

अशी पावसाची सर जावी मनात जिरून
धुंद मातीचा हा गंध उरे श्वासात भरून....

पावसाने दिला नवा गंध, नवा रंग
सारी चराचर सृष्टी झाली त्याच्यासवे दंग

नवा अंकुर पालव , शहारले पान पान
मनामनात जागले खोडकर बालपण...!!!