त्या एका दिवशी दोन घटना घडल्या.. एक घटना, नव्या आयुष्याच्या सुरवातीला शुभाशीर्वाद देणारी,,, आणि त्याच दिवशी दुसरी घटना आयुष्य संपल्याची....एकाच क्षणात त्या दोन घटनांमधून मनाची झालेली अवस्था..त्यातला अस्वस्थपणा अनुभवला मी.... लग्न होतं माझ्या सख्या लंगोटी यार असणाऱ्या मैत्रिणीचं... त्यामुळे सकाळीच आमची स्वारी लग्न मंडपी धम्माल करायला आणि कामात बुडालेली... लग्नाचा मुहूर्त जरी उशिराचा मुहुर्त होता तरी तयारी, धमाल यात तो कधी आणि कसा गेला नाहीच कळला.......!!! लग्न झालं... बाराती निघाले आणि मी आणि माझी आई घरी आलो या विचारात की मैत्रिणीचा लग्न झालं, आता आयुष्य नव्याने सुरु झालं... छान झालं.. आणि तेवढ्यात बातमी आली कि आत्या गेली.... काहीच कारण नाही पण अचानक फोन आला कि आत्या देवाघरी गेली.... दोन मिनिट काही कळेना काय झालं ते.... इतक्या दोन टोकाच्या घटना आमच्या समोर घडल्या कि आम्हाला काय करावं तेच सुचेना... देवाच्या या लीला इतक्या अनाकलनीय असाव्यात का ???????? एका क्षणात आनंद हरवून गेला आणि दुःखाने मन ग्रासून गेलं... मनाच्या अस्वस्थपणाची जाणीव होऊ लागली आणि वाटल हे असाही घडू शकत.... आनंदाच्या या क्षणी असा दुखाचा डोंगर..????????? किती सैरभैर अस्वस्थपणा, अवघडलेपण जाणवावा अशा विचित्र वेळी.... शांतता पण मनाला डाचू लागावी इतकी??? मनाला अलिप्तपणे पाहताना जाणवलं की हा ही क्षण खरंच आहे आणि जो जगलो तो देखील तितकाच खरा क्षण आहे.. वास्तवाची दाहकता अनुभवणं आणि वास्तवातील सुखद गारवा अनुभवणं हे आज ख-या अर्थाने जाणवून गेलं मनाला....!!!
माणूस आपलं आहे तो पर्यंत ते आहे हेच खरं... त्याचा आणि आपला संवाद असला किवा नसला तरी तो आहे हेच किती वेगळं असतं नं??? आणि म्हणूनच माणसातला संवाद तुटू नये.. आपलेपणा हरवू नये... प्रेम आपुलकीची नाती इगो आणि पैशाच्या हव्यासापोटी हरवू नयेत.... नाहीतर नातं असताना ते जाणवत नाही आणि ती व्यक्ती गेली तरी नंतर त्या जाणिवांचा उपयोग नाही... हेच खरं....नाही का???