नातं... दोन जीवांना बांधणारं .. कधी प्रत्यक्ष निर्माण होणारं .. कधी आपणहून निर्माण केलं जाणारं ...!!! आयुष्यात कितीतरी नाती आपण बघतो , लहानपणापासून निर्माण होणारी रक्ताची नाती....शालेय वयात जुळणारी दोस्तीची नाती... नकळत्या वयात हळूवार फुलणारी प्रेमाची नाती... धीराची, विश्वासाची, रागलोभाची, हेव्याची..........!! कितीतरी नाती आपल्याही नकळत निर्माण झालेली पण तरीही काही नाती, काही बंध असे असतात कि त्यांना कोणतं नाव द्यावं हेच उमगत नाही, आणि मग प्रश्न पडतो, ' तुझे नि माझे नाते काय....????????'
तुझ्यात आणि माझ्यात असंच एक नातं आहे... अनामिक .....!!!! सर्व नात्याहून वेगळं आहे ते... खास आहे..... प्रेम, विश्वास,आदर,रुसवे-फुगवे या सगळ्यातून फुलून आलेलं आपलं हे नातं नक्कीच त्याचं वेगळेपण जाणवून देतं... आपण एकत्र घालवलेले क्षण अगदी मोजके असतील, सहज गप्पा मारत किंवा नुसते भटकत घालवलेले असतील पण तरीही त्यातून मनात आनंद निर्माण करणारं, मनात तरतरी निर्माण करणारं काहीतरी असतं हे नक्की...!!
आपण कधी ३-४ दिवस भेटलो नाही,बोललो नाही, तर मग मनात हुरहूर का दाटून यावी...??? कुठेतरी मनात खोलवर कप्प्यात आठवणींनी जागं का व्हावं???? मनातल्या गोष्टी तुला कळाव्यात असं का वाटावं......??? तुझ्याशी बोलताना, तुझ्या सोबत असताना मनात चांदणं का फुलावं....???? काय आहे आपल्या नात्यात...??? तुझं नि माझं नातं काय...????
तुझ्या माझ्यात असणार नातं जगाच्या दृष्टीने नुसतंच मैत्रीचं असलं तरी ही ,मैत्रीपेक्षा ते जास्त खास आहे... आपल्या मनाच्या जवळीकतेचं आहे... मैत्रीपेक्षाही सुंदर, मनापेक्षाही तरल,नाजूक असलेलं नातं .....कुठले हे नातं...?????? काय नाव त्याचं.....???
intutions होतं काही काही वेळा आपल्याला .... एकमेकांना भेटण्याची, एकमेकांशी खूप काही बोलण्याची, एकमेकांसोबतचा सहवास enjoy करण्याची ओढ आपण कितीही नाही म्हणालो तरी जाणवतेच ...तुला वाटतं मी phone करीन आज, आत्ता आणि त्याचं क्षणी मी phone केल्यावर तुझ्या आवाजात जाणवणारा आनंद मला सगळं काही सांगून जातो.. तुझ्या मनातलं मी जणू शकले याचा आनंद मलाही होतो.. !!! असं समाधान फक्त तुझ्याशी संवाद साधतानाच का होतं...??? असा आनंद फक्त तुझ्यासोबत असताना, तुझ्याशी गोष्टी share करतानाच का होतो...?????? मोठ्ठा अनुत्तरीत प्रश्न ....... तुझं नि माझं नातं काय...???
वेळेचं भान होऊ न देणारं... वेळात वेळ काढून आठवणी जाग्या करायला लावणारं.... हळुवार क्षणी तुझाच आधार शोधणारं.... आनंदाच्या क्षणी तुलाही बेहोष व्हायला लावणारं.... घडोघडी तुला स्मरणारं... तुला आठवणारं... तुला चुकचुकणारं... तुझ्या छोट्याश्या message ची आतुरतेनं वाट बघणारं... तुझ्याशी कधी ही काहीही बोलायला संवाद साधायला तयार असलेलं... कुठलं हे नातं...??? काय नाव आहे या नात्याचं..???
मनात आलं की बोलून दाखवणारं... मनात न ठेवता बिनधास्त खोलून सांगणारं... तरीही अबोल असणारं... मनातल्या मनात तुझ्यासोबत आयुष्य जगणारं... मनातल्या मनात गोड स्वप्नं रंगवणारं....प्रत्येक क्षणी तुझा हात हातात धरण्याची इच्छा ठेवणारं... तुला सावरताना स्वतःलाच सावरणारं... तुला समजावताना स्वतःलाच समजावणारं... तुला आनंदी बघताच आनंदी होणारं... तुला दुःखी बघताच दुःखी होणारं... तुझं नि माझं कुठलं हे नातं ...????? कुठले हे बंध...???
आपल्या सहवासाने बाकी वातावरण फुलवणारं..... खडकाळ जमिनीतही ओलावा निर्माण करणारं.. फुलांच्या मनातला गाणं गाणारं... उडणाऱ्या पक्ष्याची भरारी पेलणारं... समुद्रासारखा शांत, गूढ, अथांग खोली असलेलं.. हिमालयासारखा शुभ्र स्वच्छ असलेलं... कोणत हे नातं ...??? तुझं नि माझं अबोल नातं..??? प्रेमापेक्षाही वेगळं..... पण प्रेमाने ओथंबलेलं.. आपलं नातं..??? काय आहे आपलं हे नातं...??? काय आहे...?????