गुरुवार, २८ जुलै, २०११

कोडं..


तुझ्या माझ्या नात्याला 
हवेच का काही नाव...???
तुझ्या माझ्या नात्याला 
माहित आहेत आपल्या मनातले भाव...

तुझ्या माझ्या नात्याला 
नको कोणता ठावठिकाणा आणि गाव
तुझ्या माझ्या नात्याला
 नको कधी खोटा अभिनिवेष आणि आव...

तुझ्या माझ्या नात्याने
जागवला नवा विश्वास...
तुझ्या माझ्या नात्याने 
जगला प्रत्येक क्षण अन श्वास...

तुझ्या माझ्या नात्याने 
नाही केला कधी विश्वासघात
तुझ्या माझ्या नात्याने
केली हसत अनेक संकटांवर मात..

तुझ्या माझ्या नात्याने
दिला आनंदाचा सूर .....
तुझ्या माझ्या नात्याने
दिला जगण्याला नूर...

तुझ्या माझ्या नात्याने
झाली धुंद धुंद ही हवा ....
तुझ्या माझ्या नात्याने
पाहिला स्वप्नपाखरांचा थवा ...

तुझ्या माझ्या नात्याचा
संथ झुलतो झुला...
तुझ्या माझ्या नात्याचा
रंग रंगवी मला .....

तुझ्या माझ्या नात्याने
बहरला हा आसमंत...
तुझ्या माझ्या नात्याने
ना उरे मनी  कुठलीच खंत ...

तुझ्या माझ्या नात्याने
मी माझी न राहिले....
तुझ्या माझ्या नात्याने
मी तुझ्यात हरपले...

तुझ्या माझ्या नात्यात
एक अनामिक ओढ..
तुझे माझे नाते म्हणजे 
न सुटलेलं कोडं....





चाहूल

काळे काळे मेघ, बरसणारे घन
उदास  उदास क्षण,  हळवे झाले मन........
अवघड वाटेवर अवघडणारे पाऊल
आयुष्याच्या प्रवासात कोणाची ही चाहूल..??

मनाच्या कप्प्यात आठवणींचे बंध
जुळलेल्या नात्यांचा जपलेला सुगंध........
शब्दाविना घडणारा अबोल संवाद
मनात अजूनही रुणझूणत्या  क्षणांचा नाद...

स्वप्नांचा सुंदर अनोळखी गाव
जगण्याच्या इच्छेतील आशेचे नाव...
उमलत्या वयाचा सुरु झाला लपंडाव
गूढ मनाचा न लागे कधी ठाव.....

प्रेम म्हणजे

प्रेम म्हणजे नसतो क्षणांचा खेळ...
प्रेम म्हणजे असतो दोन जीवांचा मेळ...
प्रेमाचा नसावा कधी खोटा आव...
प्रेमाचा असावा नेहमी खरा भाव...

प्रेम नसावं कधी मनमानी करणारं ....
प्रेम असावं नेहमी मनाला जपणारं ..
प्रेम नसावं कधी 'मी' पणा जागवणारं ..
प्रेम असावं  नेहमी संयमी,सावरणारं ..

प्रेम नसावं कधी अट्टाहासाने मिळालेलं...
प्रेम असावं नेहमी सहजपणे फुललेलं..
प्रेम न बनावी कधी एक आठवण..
प्रेम असावं नेहमी क्षणांची साठवण...

प्रेम नसावं कधी क्षणभंगुरतेचा शाप बनलेलं...
प्रेम असावं नेहमी चिरकालतेचा वरदान लाभलेलं...
प्रेम नसावं कधी स्वार्थ बघणारं ...
प्रेम असावं नेहमी भावार्थ जाणणारं ...

प्रेम नसतो कधी नुसता आभास..
प्रेम असतो कोणासाठी अडलेला श्वास..
प्रेम नसते कधी नुसती तडजोड..
प्रेम असते नेहमी मनापासून वाढणारी ओढ...

जिंदगी न मिले दोबारा ..........

जिंदगी न मिले दोबारा खुल के जी ले इसे 
ना खोना उलझनों में ,या टकराना दर्द की कश्तियों से............

खो जाना अपनी तनहाईयो में,खुद को पाने के लिये
मिल जायेगा नया रस्ता खुद को आजमाने के लिये.........

थककर हार न जाना अगर ना मिले उम्मीद का ठिकाना
सुनते रहना दिल की आवाज,जो बना दे तुज को दिवाना........

साथी मिलते रहेंगे,आगे बढते जाना तुम
दिल कभी टुटे तो,मुस्कुराके इसे छुपाना तुम......

शाम की गहराईयों में ,यादों को गले लगाना तुम
धुंदली सुबह के साथ नया रिश्ता बनाना तुम.....

हर डर को जीने की रखना दिल में उमंग
जीतोगे तो उडा सकोगे,विश्वास से उंची पतंग.....

खुद से कभी होकर अंजना,
कोशिश करना हर पल को जीने की
खुद ही समझ जाओगे एक दिन ,
क्या एमीयत है जिंदगी की .......