डोळे ...मानवी शरीराचा तसं म्हंटलं तर एक छोटा अवयव...
पण तरी त्या छोट्या डोळ्यातून उलगडतं जातं मानवी मन .....
माणसाच्या मनात डोकावण्याचा मार्ग त्याच्या डोळ्यातून जातो असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही.
कधी मनातली खळबळ व्यक्त करणारे...कधी हरखून गेलेले... कधी रडलेले... कधी रुसलेले...
कधी वेड्यागत मनातला आनंद व्यक्त करणारे... कधी प्रेमात वेडे झालेले...
तर कधी हरवून गेलेले... घाबरलेले.. गोंधळलेले .... कधी निरागस असणारे...
कधी लटका राग दर्शवणारे... कधी डबडबलेले ... वैतागलेले ... संतापाने पेटून उठलेले ....
कधी स्वप्नील, बेधुंद झालेले... कधी मिश्कीलपणे चमकणारे...
कधी अस्वस्थ, अधीरतेने वाट पाहणारे...
अशा अनेक भावछटांचे सहजसुंदर पण तितकेच वास्तव दर्शन घडवणारे डोळे मनाचा कौल दाखवतातच .....!!
आणि म्हणूनच हि दुनिया जास्त सुंदर ,लुभावणारी आहे असं मला वाटतं....
मौनाचा खरा अर्थ जाणायचा असेल तर एखाद्याच्या डोळ्यात पहावं , कदाचित सहज समजून जाऊ आपण त्यातला दडलेला अर्थ .....!!!!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा