कधीतरी असं झालंय का... की अगदी उगाचच आपलं मन हलकं हलकं झाल्यागत जाणवतं आपल्याला... असंख्य फुलपाखरं मनात रूंजी घालत आहेत असं जाणवत रहातं.... मनात उगाचच काहीतरी वेगळं, आनंदाचं भरतं आल्याच जाणवतं.... अक्षरशः वा-यावर तरंगणा-या पिसाप्रमाणे मनही अलगद उडू लागल्याचं जाणवत रहातं...अशा वेळी लबाड वारं ही येत आपल्या मदतीला... मंद मंद वारा आपल्या मनाला हलकं हलकं करू लागतो... उगाचच छान romantic गाणं गुणगुणु लागतोच आपण....वाटतं अगदी रस्त्यात असताना सुद्धा की घ्यावी एक गिरकी स्वतःभोवती आणि जगाची, आजुबाजुच्या माणसांची तमा न बाळगता बिनधास्त आपला आनंद व्यक्त करावा....... खरतरं आपल्या आयुष्यात तसं तर काहीच खास घडलेलं नसतं पण तरी वाटत रहातं की काहीतरी खास वाटतयं आज...!!!!!!!! काहीतरी वेगळंच वाटतयं...!!!! आपल्याला जाणवतयं ते जगाला ओरडून सांगावसं वाटू लागतं... मनातलं हळूच डोळ्यातून चमकू लागतं आणि मग चेह-यावर एक गोड हसू येतचं आपल्या... खरं खरं अगदी असंच होत ना..??????? छान वाटत ना तेव्हा....!!!!. किती वेगळाचं पण आल्हाददायी असतो ना तो अनुभव....????
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा