काळे काळे मेघ, बरसणारे घन
उदास उदास क्षण, हळवे झाले मन........
अवघड वाटेवर अवघडणारे पाऊल
आयुष्याच्या प्रवासात कोणाची ही चाहूल..??
मनाच्या कप्प्यात आठवणींचे बंध
जुळलेल्या नात्यांचा जपलेला सुगंध........
शब्दाविना घडणारा अबोल संवाद
मनात अजूनही रुणझूणत्या क्षणांचा नाद...
स्वप्नांचा सुंदर अनोळखी गाव
जगण्याच्या इच्छेतील आशेचे नाव...
उमलत्या वयाचा सुरु झाला लपंडाव
उमलत्या वयाचा सुरु झाला लपंडाव
गूढ मनाचा न लागे कधी ठाव.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा