गुरुवार, २८ जुलै, २०११

प्रेम म्हणजे

प्रेम म्हणजे नसतो क्षणांचा खेळ...
प्रेम म्हणजे असतो दोन जीवांचा मेळ...
प्रेमाचा नसावा कधी खोटा आव...
प्रेमाचा असावा नेहमी खरा भाव...

प्रेम नसावं कधी मनमानी करणारं ....
प्रेम असावं नेहमी मनाला जपणारं ..
प्रेम नसावं कधी 'मी' पणा जागवणारं ..
प्रेम असावं  नेहमी संयमी,सावरणारं ..

प्रेम नसावं कधी अट्टाहासाने मिळालेलं...
प्रेम असावं नेहमी सहजपणे फुललेलं..
प्रेम न बनावी कधी एक आठवण..
प्रेम असावं नेहमी क्षणांची साठवण...

प्रेम नसावं कधी क्षणभंगुरतेचा शाप बनलेलं...
प्रेम असावं नेहमी चिरकालतेचा वरदान लाभलेलं...
प्रेम नसावं कधी स्वार्थ बघणारं ...
प्रेम असावं नेहमी भावार्थ जाणणारं ...

प्रेम नसतो कधी नुसता आभास..
प्रेम असतो कोणासाठी अडलेला श्वास..
प्रेम नसते कधी नुसती तडजोड..
प्रेम असते नेहमी मनापासून वाढणारी ओढ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा