खूप अवघड असतं, काही गोष्टी विसरणं....
नको असताना सुद्धा हसत हसत स्विकारण...
घडलेल्या घटनेवरती शांतपणे विचार करणं...
'हातात काही नाही' जाणवल्यावर मनाला सावरणं...
खूप अवघड असतं एखाद्याला जीव लावणं...
आपलं अस्तित्व विसरून दुसर्यासाठी जगणं..
कधी धडपडून देखील पुन्हा उभारी घेणं...
नव्या स्वप्नांच्या दाही दिशांना प्रवास करणं...
खूप अवघड असतं अपमानाने खचून न जाणं..
आलेल्या अवघड क्षणांवर हसत मात करणं...
आपला आधार हरवला तरी दुसर्याचा आधार बनणं...
दुसर्याच्या समाधानी डोळ्यातून जग बघणं...
खूप अवघड असतं नात्यात गुंतत जाणं...
नात्यात गुंतल्यावर अलगद अलिप्त होणं...
आपल्या अपेक्षा विसरून निस्वार्थी मानाने जगणं..
आपल्यातलाच चांगला आणि वाईट माणूस शोधणं...
खूप अवघड असतं, क्षणाचं मोल जाणणं ...
प्रत्येक क्षण जगताना उत्कटपणे जगणं...
सुखदुखाच्या छायेखाली आपल्याला फुलवणं..
निराशेच्या गर्तेतून पुन्हा आशेचे पंख पसरवणं..
खूप अवघड असतं स्वप्नातून जागं होणं..
वास्तवाचे चटके सहन करून पुन्हा स्वप्नं पाहणं..
जगण्याची धडपड करताना आपलाच आधार बनणं..
अनुभवातून शहाणं होता होता 'माणूस' म्हणून जगणं...
खरोखर कधी कधी खूपच अवघड असत वास्तव स्वीकारणं आणि वास्तवात जगण म्हणूनच की काय मन सारखं स्वप्नात असतं :)
उत्तर द्याहटवा