पहिला पाऊस...त्याचीच आठवण...
दाटून आलेलं,अवघडलेपण..
ओलेचिंब झाले प्रत्येक पाऊल..
मनात जाणवणारी त्याचीच चाहूल...
पिसाट बेभान, सुसाट वारा...
त्याने छेडलेल्या हृदयाच्या तारा...
टपटप थेंबांचा हळुवार ताल..
त्याच्या स्पर्शाची नाजुकशी शाल...
झोंबणारा वारा , झिम्माड पाऊस...
त्याच्या आठवणींचा पिंजलेला कापूस...
बरसती धारा, अंगणी क्षणात...
अजून होता 'तो' तसाच स्मरणात...
हिरव्या रंगाच्या मऊशार वाटा...
'तो' म्हणजे मनात रुतलेला काटा...
चिंब चिंब होऊनी, काही राहून गेलेले...
माझ्या प्रत्येक क्षणात त्याला मी जपलेले...
पाऊस येतो असाच नेहमी...
जाणवते मग त्याचीच कमी...
कधी कोसळतो, कधी देतो हूल..
नसूनही त्याच्या असण्याचे खूळ...
पाऊस आणि माझे , जन्मापासूनचे बंध...
तसा आहे का रे आपल्या नात्याचा सुगंध...
दूर असूनही तू माझ्या आर्त मनात...
असेन का रे मी तुझ्या, एखाद्या क्षणात....???????????
Awesome....
उत्तर द्याहटवा