प्रेम म्हणजे नक्की काय असतं..???
उमलणाऱ्या फुलाच्या सुगंधाची चाहूल असतं...
आकाशात उमटणार सप्तरंगी इंद्रधनू असतं...
प्रेम म्हणजे नक्की काय असतं..???
प्रेम कधी 'हसणं' असतं...
प्रेम कधी 'रुसणं' असतं....
प्रेम म्हणजे जगण्यातला आनंदाचा सूर असतं...
प्रेम म्हणजे नक्की काय असतं..???
मनातलं गुपित डोळ्यातून वाचलेलं असतं...
स्पर्शाच्या भाषेतून शब्दांना जाणलेलं असतं...
प्रेम म्हणजे नक्की काय असतं..???
प्रेम कधी 'जगणं' असतं...
प्रेम कधी 'मरणं' असतं...
प्रेम म्हणजे कोणासाठी तरी 'वेडं होणं' असतं...
प्रेम म्हणजे नक्की काय असतं..???
साध्या साध्या गोष्टीतून कोणीतरी खुणावत असतं...
दूर असताना सुद्धा त्याच्या असण्याचा भास असतं...
प्रेम म्हणजे नक्की काय असतं..???
प्रेम कधी 'आशा' असतं..
प्रेम कधी 'निराशा' असतं...
प्रेम म्हणजे रंगवलेल्या स्वप्नांच्या पूर्णत्वाची भाषा असतं...
प्रेम म्हणजे नक्की काय असतं..???
मनाने मनाला दिलेली आर्त साद असतं...
एकमेकांच्या भावनांना दिलेली दाद असतं..
प्रेम म्हणजे नक्की काय असतं..???
प्रेम कधी 'बेभान होणं' असतं...
प्रेम कधी' भानावर येणं' असतं..
प्रेम म्हणजे स्वप्नांसोबत वास्तवात जगणं असतं...
प्रेम म्हणजे नक्की काय असतं..???
आयुष्याच्या वाटेवरती कोणाची तरी साथ असतं..
विश्वासाने धरलेला न सुटणारा हात असतं..
प्रेम म्हणजे नक्की काय असतं..???
प्रेम कधी 'भेटीची आस' असतं..
प्रेम कधी 'मिठीचा भास' असतं...
प्रेम म्हणजे आपल्या मनाने कोणाचा तरी घेतलेला ध्यास असतं..
प्रेम म्हणजे नक्की काय असतं..???
'तुझं-माझं' 'मी' पण जाऊन 'आपलं' म्हणणं असतं..
दोन जीव म्हणून जगताना मनाने एकरूप होणं असतं..
प्रेम म्हणजे नक्की काय असतं..???
प्रेम कधी 'घातलेला वाद' असतं..
प्रेम कधी 'अबोल संवाद' असतं..
प्रेम म्हणजे वाट बघताना कोणासाठी तरी अवघडलेला श्वास असतं...