खरंच असतं का कोणी आपलं...??
आयुष्याचा प्रत्येक क्षण व्यापणारं ..
भावना जागताच,नजरेत उमटणारं ..
नुसत्या आठवणीनी मनात घुटमळणारं ..
खरंच असतं का कोणी आपलं...??
नाजूक धाग्यांनी मन जोडणारं ..
नुसत्या प्रेमाने साथ देणारं ..
छोट्या छोट्या गोष्टी मनात जपणारं ...
खरंच असत का कोणी आपलं...??
अवघड क्षणी हातात हात घेणारं ...
आर्त साद घालताच धावत येणारं ..
आश्वासक स्पर्शातून धीर देणारं ..
खरंच असतं का कोणी आपलं...??
आपल्या आनंदाचा सूर शोधणारं ..
आपल्यासाठी फक्त आपल्यासाठी जगणारं ...
आपल्या आयुष्यासाठी प्रार्थना करणारं ..
खरंच असतं का कोणी आपलं...??
आपल्यापासून दूर पण आपल्या अगदी जवळ असणारं ...
न सांगताच मनातलं हितगुज जाणणारं ...
डोळ्यांच्या भाषेतून मनातलं बोलणारं ......
apratim...kharaach chaaan,,,,,agadi manatlya goshti.kiti surekh shabdaat express kela aahe..superb keep it up !
उत्तर द्याहटवाasat koni apala javalcha, javalch asanar tarihi n samajnara......... a truely said.
उत्तर द्याहटवा