ती संध्याकाळी गाणं ऐकत होती ...
'स्वप्नातल्या कळ्यानों , उमलू नकाच केव्हा ... गोडी अपूर्णतेची लावील वेडं जीवा....'

आणि तिला टचकन भरून आलं...!! अपूर्ण स्वप्नं अशीच जीवाला वेड लावून गेल्याचं तिच्या मनाला जाणवलं.......तिला आठवला तो... शेवटचं भेटलेला...किती सहज सांगितलं त्याने तिला, "आता आपण इथेच थांबायचं या वळणावर ........!!!! " तिला सांगताना देखील, तो किती शांत होता ते बघताना खूप नवल वाटलं...धक्का तर बसलाच...!!! पण तो शांत आहे हे कळल्यावर तिने चिडचिड करून काहीच उपयोग नव्हता... कारण त्याने त्याचा निर्णय सांगण्यासाठी बोलावलं होतं तिला .....!! तिचा निर्णय,तिचं मत काय असेल हे विचारायचं नव्हतं त्याला.... कारण त्याला माहित होतं की तिचा विचार किती पक्का आहे ते आपल्याबाबतीत .....!!!!
समजुतदारपणे होतं तिचं वागणं अगदी पहिल्यापासून ... !!! त्यामुळे त्याक्षणी देखील ती शांत राहिली ... त्याचे शब्द ऐकताना मनात आलेला मोठ्ठा आवंढा गिळला तिने मोठ्या मुश्किलीने.....!! त्याला धीर देत सावरत राहिली खरी ती, पण तिलाच आतून जाणवलं की हा पोकळ दिलासा आहे. शब्द काहीवेळा हरवून जातात कसे अचानक...... !!!!!!!!!!!!
त्याला समजावत आहोत आपण की आपल्या मनाला खोटा दिलासा देत आहोत आपण.....????? त्याचा हा निर्णय त्याने अचानक का घेतला हे कारण त्याने तिला सांगितल्यामुळे तिला एक गोष्ट कळली होती, की तो प्रेम करत होता तिच्यावर मनापासून.... अगदी मनापासून... पण या घडीला त्याला अलिप्तपणे बाहेरच्या जगात वावरायचा होतं.... नातं तोडायचं तर नव्हतं, पण जोडलेलं नातं जपताना त्याची ओढाताण होतं होती बहुदा....!! तिला वाटलं, असा विचार स्वप्नात पण आपण कधी केला नव्हता... !!!!! आयुष्यात आलेल्या प्रत्येक मुलाशी आपण कायम मित्र म्हणून वागलो... मैत्रीच्या नात्यालाच सांभाळलं ... आणि अचानक तो भेटला तेव्हा वाटलं, तो मित्रापेक्षाही कोणीतरी खास आहे आपल्यासाठी.... जवळचा मित्र आहेच तो, पण तरी तो इतरांपेक्षा आपल्या जास्तच जवळ आहे... काकंणभर जास्तच....!!!! त्याच्या नजरेत कायम वेगळा भाव जाणवतो...त्याच्या सोबत असताना खूप छान वाटतं आपल्याला... सुरक्षित वाटतं....!!!! आणि मग जुळली नाती अलगद हळुवारपणे......अचानक जुळलेली नाती..... किती बदलवून गेला तो अचानक जुळलेला नात्याचा बंध....!!!! छान वाटलं तेव्हा आपल्याला... आपल्या आयुष्यात कोणीतरी रंग भरू लागल्याचं जाणवलं... फक्त आपला विचार करणारं कोणीतरी आहे ही भावनाच आपला प्रत्येक क्षण सुंदर करत गेली..........!!!!

हसू आलं तिचं तिलाच.. पुन्हा जुन्या आठवणीत गुंतल्याने....!!!! तिलाच मजा वाटली आपल्या आयुष्याची... तो आला अचानक आणि गेल्या २० वर्षातला एकही दिवस इतका सुंदर नव्हता वाटला तिला... काहीतरी वेगळ होतं त्या वेड्या दिवसात.......वाट बघण्यात... वाद घालण्यात, भांडण करण्यात आणि नन्तर पुन्हा एकमेकांना समजावण्यात....!!!!! ती हुरहूर... ते वेडे करणारे दिवस... त्या बेधुंद जगात आपण होतो आणि एकमेकांशिवाय आपल्याला काही करमत नव्हतं.....!!!! काय मजा असते 'प्रेमात' ???? इतकी जादू होते एकदम की आपल्या प्रत्येक दिवसात ... आपल्या प्रत्येक क्षणात तो असतोच.... छोट्या छोट्या गोष्टीत तो कुठ्ठून तरी डोकावतोच...!!!!
पण आता ???? आपल्या आठवणीत तो असेलच... आपल्या स्वप्नात तो तसाच आठवेल का आपल्याला.... ??? आपल्या आठवणीने रात्री बेरात्री अस्वस्थ होणारा... अचानक कुठेंतरी समोर येऊन आपल्याला सुखद धक्का देणारा.... आपल्या साठी काहीतरी गिफ्ट्स आणणारा... अचानक आपल्याला phone करत .... आपल्याला हट्टाने लाड करायला लावणारा... आपल्यासोबत पावसात चिंब चिंब भिजणारा, भिजवणारा....... आपल्या असण्याने खूष असणारा .... आपल्या अवतीभवती करणारा... आपली काळजी घेणारा.......आठवेल का तो असाच.......?????? आता, आपल्यापासून लांब गेल्यावर त्याला आठवतील का आपल्या छोट्या छोट्या गोष्टी........ ???? आठवतील का आपल्यासोबत घालवलेले ते क्षण... त्या क्षणांनी दिलेला आनंद... त्या गप्पा.. त्या तक्रारी.. ती बैचेनी .... ती हुरहूर जाणवेल का त्याला...???? आपल्यासारखा कधी तो पण अस्वस्थ होईल का??? आठवणीनी बेजार होऊन तो देखील रात्री शांत झोपू शकेल का??? का, मला आठवत कधी तरी डोळा लागेल त्याचा....???? तिला वाटलं, किती विचार करतो आपण त्याचा...!!! इतकं त्याच्यात गुंतलोय आपण हे आज कळतंय आपल्याला....आणखी जास्त जाणवतंय.... ते त्याच्यापासून दूर गेल्यावर....!!!!

मनापासून प्रेम केलं आपण त्याच्यावर... आयुष्यात पहिल्यांदा स्वप्नं पाहिली भावी आयुष्याची त्याच्या साथीने... किंबहुना त्यानेच शिकवली ती बघायला ....आणि आता ती विसरून जायची आपण... पाटी कोरी करायची आता.... मनापासून प्रेम केल्याची ही असते का शिक्षा... ?? देवा...असंच जर करायचं होतं तर का आलो आम्ही एकमेकांच्या आयुष्यात...??? का स्वप्नं बघितली एकमेकांच्या साथीने..??? आणि आता तीच तोडायची... नवी स्वप्नं बघायची तरी का...??? कोणासाठी??? नाही वाटत आता बघावीशी अशी स्वप्नं पुन्हा....पण कोणाची तरी स्वप्नं आपण पूर्ण करावीत अशी त्या व्यक्तीची अपेक्षा असेल तर?? आपल्याकडूनच पूर्ण होणार असतील तर ती पूर्ण सुद्धा होताील.... पण मग आपल्या स्वप्नांचं काय...? ती अशीच अपूर्ण रहाणार कायमची....पण त्या अपूर्ण स्वप्नांची अशीच गोडी जीवाला वेडं लावणार.....!!!! आज ख-या अर्थाने तिला त्याओळींचा अर्थ कळला आणि नकळत डोळ्यातं आलेलं पाणी पुसत ती पण गुणगुणू लागली.." गोडी अपूर्णतेची लावील वेडं जीवा..."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा