मनाचा खेळ अद्भुत सारा....
कितीतरी खोल विचाराचा पसारा...
खोल...खोल ...कुठेतरी गूढ गूढ वातावरण...
कशाचा अन कुठे, पत्ता नसतो क्षण अन क्षण....!!!!
कधी हसतो अचानक, कधी टचकन पाणी डोळ्यात..
काय झालं .. कसं झालं..जाणवतं मात्र मनात....!!!
मनाच्या अस्तित्वाची नाही खूण जरी....
भावना जाणवतात हीच नाही का ओळख खरी...??
आपला आणि मनाचा प्रवास आहे कायमचा..
कधी असा... कधी तसा... ना कधी मिटायचा....
मनाच्या कप्प्यात दडलेली गुपितचं गुपितं...
काहींची असतील उत्तरे, काही मात्र अनुत्तरीत...
मन, कधी खट्याळ... मन, कधी बाल्य...
मन, कधी आशा... मन, कधी शल्य...
मन, कधी प्रेरणा... मन, कधी यातना....
मन, म्हणजेच जाणवणारी प्रत्येक संवेदना...!!
मन, कधी अबोल ... मन कधी उदास..
मोहरलेल मन म्हणजे आनंदाचा ध्यास...
मनाला सावरणं.... मनाला आवरणं...
मनानेच मनाची समजूत घालण...
'मन' म्हणजे आपण?? का आपण म्हणजे मन...????
हाच विचार करता करता, जगतो आपण
कधीतरी, कातरवेळी सलत काहीतरी मनात...
गर्दीत असून देखील आपण एकटे पडतो क्षणात...!!!
मनाच्या कप्प्यात किती मोहित भावना...
पण मनच सांगत रहात , कर याचा सामना..
मन...मन.. मन.. आहे नक्की काय कळत नाही...
जाणवत रहात कायम, पण दिसत मात्र नाही...,,!!
apratim ....................
उत्तर द्याहटवाPan disat matra nahi........ tarihi manacha pasara janu morach pisara..
उत्तर द्याहटवाKhup chan Ketaki!!! Manacha pasaracha asto....!! Disat nasatanahi matra janavat rahato!!
उत्तर द्याहटवाकेतकी, मैत्रिणी .. तोडलंस ....!! मनातल्या भावनांना मनाची रूपं दाखवून तोडलंस ...!!
उत्तर द्याहटवामन तळ्यात .. मळ्यात .. प्रमाणे काहीतरी चाल लावून ह्या ओळी गुणगुणाव्याश्या वाटताहेत ..!!