बुधवार, १७ मे, २०१७

                      आज खूप दिवसांनी तो तिला भेटणार होता... गेले काही दिवस त्याच भेटणं तर झालंच  नव्हतं पण फोनाफोनी पण फारशी झालेली नव्हती... तिने फोन केला तरी तो '' कामात आहे, busy आहे नंतर बोलू '' असं काहीबाही सांगून तिच्याशी बोलणं टाळत होता किंवा कमी बोलत होता... पण आज त्यानेच तिला आपणहून फोन केला होता. आज संध्याकाळी तो तिला भेटणार होता , long drive करत तिच्यासोबत पूर्ण संध्याकाळ घालवून परत यायचा plan त्याने केला होता... तसं त्याने तिला कळवलं पण होतं ... she was so  happy ..!!! कारण खूप दिवसांनी आज दोघे एकमेकांना भेटणार होते.... मनसोक्त गप्पा मारणार होते... एकमेकांच्या हातात हात घेऊन भावी आयुष्याची गोड  स्वप्न रंगवणार होते... एकमेकांच्या कुशीत खूप वेळ शांतपणे राहणार होते... त्याला भेटायला जायचं असलं की ती कायमचं खुश होऊन जायची... त्याचा romantic स्वभाव... रोमँटिक बोलणं... style सगळंच तिला मनापासून आवडायचं ... तो होताच तसा.. वेड्यागत वागणारा पण अतिशय मनापासून तिच्यावर प्रेम करणारा... तिची काळजी घेणारा .... तिला सारखा phone किंवा message करून आपल्या असण्याची जाणीव करून देणारा... आपली आठवण काढायला लावणारा... !!!!
                     पण गेले काही दिवस मात्र त्याला अजिबात वेळेचं , काळाचं भान नव्हतं... office च्या एका project ची जबाबदारी आहे माझ्यावर असं त्याने तिला सांगितलं होतं , पण त्यामुळे त्याला तिच्याशी बोलायला पण वेळ मिळत नव्हता.... तिचा जीव मात्र वरखाली झालेला त्या दिवसात...!! त्याचा phone नाही. ...एक message सुद्धा नाही... phone केला तर साहेब busy ...!!!  तिला खूप वाईट वाटू लागलं होतं ... रोजच्या त्याच्या sms, calls ची सवय झाली होती... ' तासनतास बोलत ; चेष्टामस्करी करत किती गप्पा मारतो आपण ' हे आठवून तिला अधिकच त्रास होत होता ... आणि आता..??  सैरभैर होऊन गेली होती एकदम त्याच्या अशा वागण्याने ....!!! काय झालंय  हे काही कळत नव्हतं  कारण तो कितीही busy असला तरी तिला एखादा phone किंवा message करायचाच तो... !!! पण ह्यावेळी मात्र तिला उगाचंच काहीतरी चुकीचं घडतंय किंवा घडणार आहे अशी भीती वाटू लागली होती
                    पण आज त्याने फोन केल्यामुळे तिला बरं वाटलं होतं ... मनातल्या अनेक शंकाकुशंका दूर सारल्या गेल्या होत्या... त्याला इतक्या दिवसांनी भेटायचं म्हणून ती खूपच आनंदून  गेली होती... तिने मनोमन बजावलं स्वतःला " आज त्याच्यावर रागवायचं नाही तर त्याच्यासोबत खूप गप्पा मारायच्या ... त्याचा हात हातात घेऊन पुन्हा आपल्या प्रेमाचा वर्षाव त्याच्यावर करायचा ... त्याचा ताण, ऑफिस मधली tensions कमी करायचा प्रयत्न करायचा... त्याला खूप काही सांगायचं आहे आज आपल्याला... आणि आपल्यालाही त्याला खूप काही सांगून मन हलकं करायचं आहे ... " कधी एकदा संध्याकाळ होते आहे आणि आपण त्याला भेटतो आहोत असं होऊन गेलं तिला... !!!!
               तिने जाणीवपूर्वक त्याला आवडतो तो dress घातला. नेहमीसारखी लांबसडक केसांची घट्ट वेणी घालून तिने त्यावर मोगऱ्याचा गजरा माळला ...' वेणीवर गजरा छान दिसतो तुला... ' हे त्याच वाक्य आठवून तिला खुद्कन स्वतःशीच हसू आलं ... !! चेहऱ्यावर फार make up न करता हलकासा पावडरचा हात फिरवून, डोळ्यात काजळ घालून ती तयार होऊन बाहेर पडली ... त्याला भेटायला...!!
                   ठरलेल्या ठिकाणी, वेळेच्या आधीच ती त्याला त्याची वाट पाहत असताना दिसली ...त्याने Car थांबवली आणि तिला हळूच आत बसायची खूण केली.. ती सुद्धा हलकेच दार उघडून आत बसली... त्याने तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहिलं ... त्याला तिचा तो हसरा  चेहरा पाहून खूप प्रसन्न वाटलं , तिच्या गजऱ्याच्या वासाने त्याला सगळा ताण हवेत विरून गेल्यागत वाटू लागलं....!!! ती मात्र बसल्या बसल्या त्याला लटक्या रागात बोलू लागली; " भेटला नाहीस म्हणून रागावले आहे.  किती आणि काय भीतीदायक विचार मनात येऊ लागले होते मनात " असं काहीबाही ती बोलू लागली... त्याला तिची अशी बडबड ऐकताना गंमत वाटत असे नेहमी..!! किती आणि काय सांगू असं होऊन जातं तिला नेहमी ...आणि आता तर खूप दिवसांनी आपण भेटतोय म्हंटल्यावर बाईसाहेब भरपूर गप्पा मारणार हे नक्की ...!!! ती काहीबाही सांगत राहिली college चे किस्से , मैत्रिणीच्या लग्नाची गंमत आणि  केलेली धमाल..... पण तो मात्र कुठल्यातरी विचारात आहे असं तिला जाणवलं. नेहमी सारखा तो हसत नाही की बोलत  नाही आहे ..  तो शांत वाटतोय खरा पण नेहमीसारखा वाटत नसल्याचं तिला जाणवलं ... तिने त्याला त्याबद्दल विचारलं सुद्धा पण तो '' काही नाही अगं , बोलू आपण  जवळ पोचलो की ... " असं म्हणाला... त्यामुळे मग तिने फार काही खोदून विचारलं नाही...
        कॅफे जवळ पोचेपर्यंत मग ती पण जरा शांतपणे बसली... मोकळ्या वाऱ्याचा आस्वाद घेत ती पण त्याच्या मनात काय आहे हे विचार करत बसली... शेवटी एकदा कॅफे आला आणि दोघेही coffee ची ऑर्डर देऊन एका टेबलजवळ स्थिरावले ... त्याने शांतपणे तिच्याशी बोलायला सुरवात केली, " ऋतू , तुझ्याशी काही दिवसांपासून मी नीट बोललो नाहीये... बोलायचं तर होतं पण कामाच्या व्यापात नीट बोलता येणं शक्य नाही झाला त्याबद्दल sorry. ..!! पण मला तुझ्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत... " त्याचं हे बोलणं  ऐकतानाच तिला जाणवलं की काहीतरी घडलयं  किंवा घडणार आहे ज्याची आपल्याला भीती वाटत होती तसंच काहीतरी... पण तरी तिने शांतपणे त्याच्या बोलण्याकडे  लक्ष द्यायला सुरवात केली...  तो थोडासा अवघडल्यागत वाटत होता पण तरी त्याने बोलायला सुरवात केली " आपण best friends आहोत आणि कायम राहूच गं ऋतू , पण आपलं आत्ताच नातं आपण इथेच थांबवूया ... म्हणजे आपण थोडासा वेळ घेऊयात... मला.... मला  वेळ हवाय आपल्या नात्यासाठी... please माझ्याबाबत गैरसमज नको करून घेऊस..  पण मला आता असं वाटतंय की मी इतक्यात आपल्या या नात्यासाठी तयार नाहीये पूर्णपणे... आपण आहोत गेले ४/५ वर्ष एकमेकांसोबत अगदी college पासून पण तरी.... ''  तिला कळून चुकलं होतं, की त्याचा निर्णय त्याने आधीच घेतला आहे. फक्त त्याला तो आपल्याला सांगायचा होता.. इतके दिवस त्याला हे सांगण्यासाठी वेळ हवा होता. आणि त्यासाठीच हा मधला काळ तो आपल्यापासून लांब होता... मनातून त्याची होणारी चलबिचल तिला त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती, पण तरीही त्याने तिला सगळं स्पष्टपणे सांगितलं , जे तो नेहमी करत आलाय... आणि आजही त्याने तेच केलंय... !!!
            तिला थोडावेळ काय बोलावं तेच कळेना...  तिने त्याच्याकडे पाहिलं ... त्याच्या डोळ्यात असणारं प्रेम तिला दिसत होतं पण तरीही ते डोळे कुठेतरी बैचेन आहेत... खूप काहीतरी जाणवलं त्याच्या डोळ्यातं  तिला... पण....  तिने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला शांत केलं ... निदान तसा  प्रयत्न तरी केला... तिला त्याचा स्वभाव पूर्णपणे माहीत होता...  जेव्हा तो खूप frustrate होतो तेव्हा एका क्षणी तो एकदम असं  टोकाचं बोलतो देखील...!! किंवा खूप जबाबदाऱ्या येऊ लागल्या कि त्याला असं अचानक खूप वैतागवाणं होतं ... आणि मग तो त्यापासून काही काळ लांब जाऊ इच्छितो, पण आज त्याने अचानक असा निर्णय घेतला आहे हे कळल्यावर तिला काय बोलावं हा प्रश्न पडला.. तिने त्याला शांतपणे त्याच्या मनातलं बोलू द्यायचं ठरवलं... आणि त्याच्या निर्णयात आपण कुठेही ढवळाढवळ नाही करणार हे ही मनाशी ठरवलं... दाटून आलेल्या डोळ्यातलं पाणी हसत हसत लपवत  तिने त्याचा हात हातात घेतला, थोपटलं हलक्या हाताने... त्याला म्हणाली ती, " तू तुझा निर्णय घेतला आहेस... आणि तो मला सांगितलंस हे उत्तम केलंस... तुला हवाय ना वेळ तो तू घे... त्यानंतरही तुला जे वाटेल ते तू मोकळेपणाने सांग मला... मी कायम पहिले तुझी मैत्रीण आहे आणि  मग तुझी प्रेयसी... आणि माझ्यामते, कोणतंही नातं जेव्हा बनतं तेव्हा ते दोन्ही व्यक्तींच्या मनाच्या अलवार बंधातून जुळतं , ते नातं जेव्हा अशा एका निर्णायक क्षणी निभावणं अवघड वाटू लागतं तेव्हा ते नातं तिथेच थांबवणं जास्त योग्य आहे .. !! जबरदस्तीने जुळलेली नाती कधी टिकत नाहीत.म्हणूनच तुझ्या ह्या निर्णयामागे काहीतरी विचार असेल नाहीतर तू मला असं अचानक नातं थांबवावं किंवा तोडावं असं म्हणणारा नाहीस ....तुला कोणत्याही बंधनात मला ठेवायचं नाही... जे नातं आपल्यात आहे ते फक्त मैत्रीचं असेल यापुढे... !! '' ती स्वतःशीच हसली, आणि म्हणाली '' तुला खूप चांगलं ओळखते रे मी... अगदी मनापासून... कदाचित तुझ्यापेक्षाही जास्त..!! तू असा अचानक बोलेनासा झालास, किंवा काहीबाही कारणं देऊन बोलणं टाळू लागलास तेव्हाच मला जाणवलं की काहीतरी झालयं  जे तुला सांगताना त्रास होतोय पण सांगायचं आहे मला... !!! बरं झालं सांगितलंस ते... इतका ताण घेऊन इतके दिवस तू वावरत होतास आणि मला हि काहीच कळेना काय झालंय ते, त्यामुळे मला पण एक ताण आलाच होता... पण आज तो ताण आणि त्याचं कारण सगळंच कळलं आहे मला... " आता आपण जे बोलू ते फक्त मैत्रीच्या नात्याने हे मी मला समजावेंन आणि तुलाही  ते समजून घ्यावं लागेल... कदाचित सुरवातीला ते तसं बोलणं सुद्धा अवघड वाटू लागलं तर आपण काही काळ समजुतदारपणे एकमेकांशी काहीच contact  नको ठेवायला... ते अवघडलेपण आपल्या मैत्रीला नको disturb करायला... एवढीच आहे माझी इच्छा .."
                  तिच्या त्या बोलण्यातून त्याला जाणवलं ,' ती किती समजुदारपणे वागते कायम... ती अशी आहे म्हणूनच आवडली आपल्याला खूप मनापासून... पण मग तिच्या इतकं समजूतदारपणे आपल्याला वागत येईल का हाच विचार मनात येत राहतो... ती आपली मैत्रीण आहे अगदी जवळची, हक्काची....!  जिला काहीही आणि कधीही सांगत येतात कुठल्याही गोष्टी... !!! " त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, ''Thanks ऋतू ''
                      तिला मात्र इतका वेळ लपवलेले अश्रू थोपवणं अवघड झालं होतं... पण त्याच्यासमोर आपल्या डोळ्यातून पाणी येता कामा नये हे बजावलं तिने स्वतःला... गळ्याशी दाटून आलेला आवंढा तिने मोठ्या मुश्किलीने थोपवला... एव्हाना गरमागरम coffee वेटरने टेबलवर आणून ठेवली. coffee  घेता घेता तिच्या मनात अनेक विचारांची दाटी झाली... " आपण काय imagine केलं होतं आणि आपल्यासमोर काय आलं हे एकदम अचानक.. ??? सगळ्याच गोष्टी एकदम बदलल्या आहेत आता... आपल्या प्रेमाच्या नात्याचा हा स्वल्पविराम की पूर्णविराम असेल... ??? खूप गुंतागुंत आहे आपल्या नात्याची... ती आता सोडवायची कशी एकदम...???  त्याने सोडवायला सुरवात केली आहे पण... मग आपण काय करायचं ?? त्याचा गुंता नाही होऊ द्यायचा ... जे जुळलंय ते दोघांच्या संमतीने.... आणि तितकंच उत्कटपणे ...!!! त्यामुळे ते इतक्या सहज तुटणार नाही हे नक्की... पण आता त्याला त्याचा श्वास मोकळेपणाने घेऊ देत... त्याला त्याच्या असण्याची जाणीव  होऊ देत... तोपर्यंत आपण त्याच्यासोबत त्याची सच्ची मैत्रीण म्हणूनच राहू..."'  तिला मात्र आता त्याच्यासमोर जरा अवघड झाल्यागत झालं, कधी एकदा घरी जातोय असं वाटू लागलं तिला.. ती त्याला म्हणाली , " जाऊयात का आता घरी .. शांत झालास का तू? आपण वाटलं तर थोडावेळ इथेच वारा खात बसू शांत वाटेपर्यंत ...." तो म्हणाला , '' नको . आपण जाऊ हळूहळू परत.. तुला उशीर नको व्हायला घरी पोचायला... चल निघुयातच आता... '' ती सुद्धा लगेचच निघाली.... गाडीत बसल्यावर त्याने  हळू आवाजात रेडिओ सुरु केला.. तिचं आवडतं गाणं लागलं होतं ..."ये दूरिया... इन राहों की दूरिया ...  कभी हुआ ये भी.. खाली राहों पें भी तू था मेरे साथ... कभी तुझे मिलके लौटा मेरा दिल भी खाली खाली हाथ...'' तिला वाटलं हाही योगायोगच का??? तिच्या मनातल्या अनेक भावना त्या गाण्याच्या शब्दाशब्दातून  व्यक्त होत होत्या... संध्याकाळच्या त्या कातरक्षणी आपल्या मनाला साद घालणारं ते गाणं ऐकता ऐकता ती शांत होत गेली... !!